हो...कोण होतास तू काय काय झालास तू
भीमरायाचे उपकार विसरलास तू
घालून सुटबुट फिरतोस मानान
तुला माणसात आणलया कुणी ...२
माझ्या भीमान भीमान भीमान ||धृ||
शिकला सवरला तुला मिळाली रे खुर्ची
भीमामुळ मिळाली रे तुला पदवी वरची
तुझ्यासाठी केलं आयुष्य त्यान खर्ची
जान जरा राहू दे भीमाच्या उपकाराची
हो... झाला धनवान तू झाला बलवान तू
चार लोकात घेतोस सन्मान तू
झाल जीवनाच सोनं भीम श्रमान
तुला माणसात आणलया कुणी ...२
माझ्या भीमान भीमान भीमान ||१||
जय भीम जय भीम जय भीम
जय भीम जय भीम जय भीम
ज्यांच्या पुण्याईने आज साहेब तू झाला
त्यांचंच खाऊन तुला माज का रे आला
बापाच्या बापाला तू बेईमान झाला
स्वार्थापाई समाजाचा घात तू रे केला
हो... जसा मिळल तसा तू रे भरला खिसा
समाजहिताचा कधी नाही घेतला वसा
राख भीमाशी आपलं तू ईमान
तुला माणसात आणलया कुणी ...२
माझ्या भीमान भीमान भीमान ||२||
आपल्या आपल्यात नको पाडू गट तट ...२
वैर्याची रात आहे झटकून उठ
ऐकीची खंबीर बांध आता मुठ ...२
भीम बाबांचं तुला र सांगतया बोट
हो... आरे हे राजेशा वैभवा जगदिशा
नको करू रे समाजाची ही दुर्दशा
भीम विचाराचा गाडा हाक जोमान
तुला माणसात आणलया कुणी ...२
माझ्या भीमान भीमान भीमान ||३||
जय भीम जय भीम जय भीम
जय भीम जय भीम जय भीम
0 Comments