Subscribe Us

header ads

गौतमाचे चरणी फूल वाहिलेले || Gautamache charni song lyrics



गौतमाचे चरणी फूल  वाहिलेले
साकार झाले स्वप्न पाहिलेले

दिनी पौर्णिमेच्या बोधीवृक्षाखाली
बुद्ध पहुडलेले ज्ञान जाग आली
ज्ञानियामुळे अवघे विश्व जागलेले
साकार झाले स्वप्न पाहिलेले

दुःख मानवी सारे बुद्धास कळले
राज्यत्याग करुनी सत्यमार्गी वळले
तयांच्यामुळे विश्व-युद्ध टळलेले
साकार झाले स्वप्न पाहिलेले

दीन-दुःखितांना सवे घेऊनिया
दया-क्षमा-शांती मंत्र देऊनिया
उद्धरले बुद्ध-मार्गी चाललेले
साकार झाले स्वप्न पाहिलेले

त्रिशरण पंचशीला अष्टांग मार्ग
विश्वकल्याणाचा दावी सन्मार्ग
सत्यशील उद्धारक धम्म निवडलेले
साकार झाले स्वप्न पाहिलेले

गौतमाचे चरणी फूल  वाहिलेले
साकार झाले स्वप्न पाहिलेले

Post a Comment

0 Comments