Subscribe Us

header ads

भीम माझा ग दिल्लीत भाषण देई | Bhim Majha G Dillit Bhashan Dei



आज पोर्णिमेच्या राती दिनदुबळ्याच्या साथी

मी स्वप्नात पाहीलाय बाई……

भीम माझा ग, 

भीम माझा ग दिल्लीत भाषण देई                 ॥धृ॥


ज्ञान गंगेत बाई मी न्हाले 

रात्री स्वप्नात तल्लीन झाले

देती गर्जना जयभीमवाले 

मन हर्षान माझे डोले

रात रंगली ग बाई काय सांगू नवलाई

झाली दर्शन घेण्याची घाई 

भीम माझा ग दिल्लीत भाषण देई

भीम माझा ग दिल्लीत भाषण देई                ।।१।।

 

माझ्या भीमाच ऐकून भाषण 

थक्क झालय पहील शासन

कुणी पाणी मागेना प्यासन, 

कुणी पाणी मागेना प्यासन, 

थक्क झालय पहील शासन, 

बाई येगळाच थाट, बाई येगळाच थाट, 

असा बाई येगळाच थाट भाषा गर्वाची केलीच नाही 

भीम माझा ग दिल्लीत भाषण देई 

भीम माझा ग दिल्लीत भाषण देई                ।।२।।


आज पोर्णिमेच्या राती दिनदुबळ्याच्या साथी

मी स्वप्नात पाहीलाय बाई……

भीम माझा ग, 

भीम माझा ग दिल्लीत भाषण देई 

Post a Comment

0 Comments