पिवळा पितांबर, त्यात लोकशाहीची जर
हिंदच्या डोहींवर शोभे घटनेचा पदर ॥ धृ॥
फुलात सजवाया हिंडले परदारी
गान्धी नेहरूजी मंडळी सारी
अमेरिकेची त्या करून तय्यारी
बर्डन षाज्ञानी हळूच उतरी
कि भारत भू सजवेल माझा
भारत भू सजवेल माझा
भीमराव आंबेडकर
अहो तो भीमराव आंबेडकर
हिंदच्या डोहींवर शोभे घटनेचा पदर ||१||
स्वातंत्र्याचा टिळा तुझाच कपाळी
तोडियाली जीर्ण रुढीची त्या जाळी
लेणं सौभाग्याचं २६ जानेवारी
केली ती करणी भिमानी सत्वरीं
शालूला भरली गं जणू
शालूला भरली गं जणू
मोत्याची किनार
अगं ती मोत्याची किनार
हिंदच्या डोहींवर शोभे घटनेचा पदर ||२||
आधीचेच होते पूर्वीचे शूरवीर
सर्वपुढे लढते बटालियन महार
मराठवाड्यात पेटलं ते काहूर
चिरली चर-चर लहान अन थोर
मग डागच हा पदरावर तुझा
डागच हा पदरावर तुझा
भिजला पितांबर हा भिजला पितांबर
हिंदच्या डोहींवर शोभे घटनेचा पदर ||३||
लोकसभा पहिली गरजले ते शहाणे
सुवर्ण अक्षरी लिहून इतिहासी पाने
करीत अभिमानें या मातीचे सोने
घालता घाला या कुहूर काळाने
दमदेरे आज झाली पोरकी
दमदेरे आज झाली पोरकी
भीमरायाची पोर हि भीमरायाची पोर
हिंदच्या डोहींवर शोभे घटनेचा पदर ||४||
पिवळा पितांबर, त्यात लोकशाहीची जर
हिंदच्या डोहींवर शोभे घटनेचा पदर
0 Comments