भीम किर्तिचा डंका
Song: Bhim Kirticha Danka
Singer: Milind Shinde
Lyrics: Suresh Jagtap
Album: Kayada Bhimacha
Label: T-Series
तरारी डोळ्यात साजे करुणेचा साज
भीम किर्तिचा डंका चहूमोलची वाज ॥धृ॥
होती जिंदगी उधार मुका देह दावणीला
कर्म कांडाच्या डोहात हुका देह बुडविला
मनुवादी व्यवस्थेचा त्यान उत्तरविला माज
भीम किर्तिचा डंका चहूमोलची वाज ॥१॥
बेकसुर जीवनाला त्यान बंध मुक्त केले
छडछावणीचे सुगे ते चिराख हो झाले
पेटल्या पाण्याची आतून ऐकू येते त्रात
भीम किर्तिचा डंका चहूमोलची वाज ॥२॥
खसा खाऊनीया त्यान देशा मानवता दिधली
सडलेल्या संस्कृतीची त्यान होली पेटविली
संविधान देवून शिरी चढविला ताज
भीम किर्तिचा डंका चहूमोलची वाज ॥३॥
कस सांगू किती सांगू क्रांतीच्या ह्या गाथा
शब्द प्रभूनीही तिथ अहो टेकविला माथा
क्रांतीचा तेज पाहून चंद्र नभी लाज
भीम किर्तिचा डंका चहूमोलची वाज ॥४॥
तरारी डोळ्यात साजे करुणेचा साज
भीम किर्तिचा डंका चहूमोलची वाज
0 Comments