Subscribe Us

header ads

Tujhya Raktamadhal Bhimrao Pahije – Anand Shinde Superhit Song Lyrics || तुझ्या रक्ता मधला भीमराव पाहिजे सुपरहिट भीमगीत



ना भाला नां बरची ना घाव पाहिजे
ना भाला नां बरची ना घाव पाहिजे..   
पण तुझ्या रक्ता मधला भीमराव पाहिजे
पण तुझ्या रक्ता मधला भीमराव पाहिजे..  ॥धृ॥

नव्या भागीताचे स्वप्न ते हसुदे
तुझी भीम शक्ती जगाला डिसुदे
कुण्या गावकीचा दुआ साधला रे
आहे भीम युगाचा नवा दाखला रे
ना पाटील ना वाडा ना गाव पाहिजे
ना पाटील ना वाडा ना गाव पाहिजे..
पण तुझ्या रक्ता मधला भीमराव पाहिजे।  ॥१॥

असे कैक वैरी अचंबित केले
रुढीच्या नातीला रे तूच चीत केले
चाललो आम्ही पण शिखर वैभवाला
गरज आज नाही कुणाची आम्हाला
ना मंत्री श्रीमंती ना हाव पाहिजे
ना मंत्री श्रीमंती ना हाव पाहिजे..
पण तुझ्या रक्ता मधला भीमराव पाहिजे    ॥२॥


तुझा तू जपावा नवा वारसा तू
स्वतः ला स्वतः घडावं माणसा तू
नको मेजवानी अशी दुर्जनाची
भाकरी ती खाऊ आम्ही इमानाची
ना रोटी ना मस्का ना पाव पाहिजे
पण तुझ्या रक्ता मधला भीमराव पाहिजे ‌‌ ॥३॥

उसळू दे त्या लाटा तुझ्या शिरा वरती
आम्हाला मिळाली अशी ज्ञान भरती
सोडला आम्ही तो वाळवंट सारा
भीमाने दिला हा सुखाचा किनारा
ना दरीया ना सागर ना नाव पाहिजे
ना दरीया ना सागर ना नाव पाहिजे…
पण तुझ्या रक्ता मधला भीमराव पाहिजे   ॥४॥

तुझ्या रक्ता मधला…

Post a Comment

0 Comments