Subscribe Us

header ads

Bhimaane koti koti kaljaj Superhit Song Lyrics || भीमाने कोटीकोटी काळजात बुद्ध कोरला सुपरहिट मराठी भीम गीत

भीमाने कोटीकोटी काळजात बुद्ध कोरला



Song: Bhimaane koti koti kaljaj
Singer: Milind Shinde
Lyrics: Vijay Kashid
Album: Kayada Bhimacha
Label: T-series


मानवतेचा शिल्पकार ह्या जगामध्ये ठरला
भीमाने कोटीकोटी काळजात बुद्ध कोरला ॥धृ॥

मानवतेचे जेजे संहारी दिली भीमाने त्यांना ललकारी
बुद्धिपुढे नमल्या तलवारी
मानवतेचा वैरी भीमाने वेळीच मारला
भीमाने कोटीकोटी काळजात बुद्ध कोरला ॥१॥
पाशानांना फोडली वाचा धम्म बुद्धाचा देऊनी साचा
मानवतेचा बनविला ढाचा
पंचशीलेचा मंत्र भीमाने होट्यात भारला
भीमाने कोटीकोटी काळजात बुद्ध कोरला ॥२॥

बुद्ध ज्ञानाचे पाजले नीर अंधश्रद्धा ती लोटली दूर
बुद्ध चरणाशी नमविले शिर
विथुरलेला हा समाज एकतेन हेरला
भीमाने कोटीकोटी काळजात बुद्ध कोरला ॥३॥

निर्मळ जीवनाचा आनंद मानवतेचा दरवळे गंध
हर्ष जाहला हा बेधुंद
विजय तुझ्या परी विश्वाने हा धम्म स्वीकारला
भीमाने कोटीकोटी काळजात बुद्ध कोरला ॥४॥

मानवतेचा शिल्पकार ह्या जगामध्ये ठरला
भीमाने कोटीकोटी काळजात बुद्ध कोरला

Post a Comment

0 Comments