शिकला गरिबीत शाळा कुणी शीकुण दाखवा
काढले दिवस दुःखाचे कुणी काढून दाखवा
जो केला भीमाने त्याग कुणी करून दाखवा
आणि या भारताचा कोहिनूर हिरा बनुण दाखवा
बहु झाले अन् बहु होतील या धरतईच शान
तुझ्या परि रे कोणी नाही भीमा तूच महान ||धृ||
पिढ्या पिढ्या रे असेच होते अर्थविहीण हे जगणे
कुणास त्याची पर्वा न होती तुच उठवली राणे
थोर मसीहा दिन दुबळ्यांचा ऊंचवलीस तु माण
तुझ्या परि रे कोणी नाही भीमा तूच महान ||१||
भरभरजीनी अमंरीत पुसली तोंडावरची पाने
ऐक्य आमचे पुन्हा तु दिधले केले आम्हा शाहाणे
कार्य तुझे हे सांगून जाते इतिहासाचे पान
तुझ्या परि रे कोणी नाही भीमा तूच महान ||२||
तुझ्या कृपेने मिटली आमची अज्ञानाची दारे
मनुवाद्यांच्या गुलामगिरीतून मुक्त जाहले सारे
राहशील येथे अजरामर तू गाई तुझे मी गाणं
तुझ्या परि रे कोणी नाही भीमा तूच महाण ||३||
बहु झाले अन् बहु होतील या धरतईच शान
तुझ्या परि रे कोणी नाही भीमा तूच महाण
0 Comments