Subscribe Us

header ads

काय सांगू तुला आता, भीम माझा कसा होता song lyrics





काय सांगू तुला आता, भीम माझा कसा होता ? 
लेकराला जशी माता, भीम माझा तसा होता ।।धृ।।

झुंज देऊन काळाशी, सात कोटी गुलामांचा 
उंचविला इथे माथा, भीम माझा असा होता ।।१।।

रास लावून ज्ञानाची, वाटली ती गरिबांना 
पाहिला ना कधी जो, तो पामराला पसा होता ।।२।।

कायद्याच्या स्वरूपाने त्याच माझ्या दयाळाने 
दान केला ह्या देशाला, ज्ञान साठा असा होता ।।३।।

वाट खर्चास जाताना, गौतमाच्या निवासाला 
दिला काढून कमरेचा, बांधलेला कसा होता ।।४।।

अंतःकरणाच्या पाटीवर, दीनदुबळ्या समाजाच्या 
युगे युगे जो राहील तो, भीम माझा ठसा होता ।।५।।

काय सांगू तुला वामन, भीम माझा कसा होता 
सात ठिगळ्यांच्या बंडीचा, भीम माझा खिसा होता ।।६।।

Post a Comment

0 Comments