Bhima Tujhya Matache song lyrics - भीमा तुझ्या मताचे

Buddha Bhim Songs
0


भीमा तुझ्या मताचे जर पाच लोक असते
तलवारीचे तयांच्या न्यारेच टोक असते           ।। धृ ।।


वाणीत भीम आहे, करणीत भीम असता 
वर्तन तुझ्या पिलांचे सारेच चोख असते
तलवारीचे तयांच्या न्यारेच टोक असते              ।। १ ।।


गोळी खुशाल घाला फाशी खुशाल द्यारे 
खोटे इथे खऱ्याचे दुसरेच टोक असते
तलवारीचे तयांच्या न्यारेच टोक असते             ।। २ ।।


तत्वाची जण असती बिनडोक लोक नसते 
सारे चलन तयांचे ते रोख ठोक असते 
तलवारीचे तयांच्या न्यारेच टोक असते            ।। ३ ।।


सदभाव एकतेचे जर अंतरात असते 
चुकले कुणीच नसते सारेच एक असते 
तलवारीचे तयांच्या न्यारेच टोक असते           ।। ४ ।।


वामन सामान सारे स्वार्थाने अंध नसते 
तुझीया कृतीप्रमाणे सारेच नेक असते 
तलवारीचे तयांच्या न्यारेच टोक असते         ।। ५ ।।


भीमा तुझ्या मताचे जर पाच लोक असते
तलवारीचे तयांच्या न्यारेच टोक असते   

Post a Comment

0 Comments

Post a Comment (0)
3/related/default