Savali God Tuzi song lyrics in marathi | साउली गोड तुझी lyrics

Buddha Bhim Songs
0





SINGER :- MILIND SHINDE MUSIC ARRANGEMENT AND PROGRAMMING :- MADHUUR MILIND SHINDE LYRICS :- VAMAN DADA KARDAK VIDEO AND DOP :- VAIBHAV YADA MUSIC LABEL : M.S MUSIC

बोधी वृक्षा मला लागली ओढ तुझी
साउली गोड तुझी, साउली गोड तुझी     ।। धृ ।।


सुगंधी वेली जशी फुले तुझ्या भवताली

जशी गौतम सख्याच्या अंतरातली पाली

अशा वेळीस इथे असावी जोड तुझी

साउली गोड तुझी, साउली गोड तुझी     ।। १ ।।

तुझ्या छायेत आणि मायेच्या पंखाखाली

इथेच गौतमाला ज्ञानाची प्राप्ती झाली

तुझ्या छायेसी जागी नाही तोड दुजी

साउली गोड तुझी, साउली गोड तुझी     ।। २ ।।


ठाई ठाई तुझे कोंब तुचं फुलवावे

बोधी वृक्ष करून तुझ्या परी डुलवावे

मुळी तुझीचं पुन्हा बनावी मोड तुझी

साउली गोड तुझी, साउली गोड तुझी     ।। ३ ।।


प्रेरणा तुचं इथे व्हावी आता वामनाची

प्रतिभा पावसात न्हावी आता वामनची

बनावी तुचं आता गाणी गोड तुझी

साउली गोड तुझी, साउली गोड तुझी     ।। ४ ।।


बोधी वृक्षा मला लागली ओढ तुझी

साउली गोड तुझी, साउली गोड तुझी



Post a Comment

0 Comments

Post a Comment (0)
3/related/default