सर्व जगावर ठसा उमटवला
कीर्तीचा हा प्रभाव
घटनेच्या पहिल्या पानावरती
गाजतय माझ्या भिमाच नाव
होती गुलामी गल्याळ दोरी
राष्ट्रगीत म्हण्या जोरी
साक्ष पुरावा देईल सारी
ती २६ जानेवारी
अश्या तुफानी माझ्या भिमानी
किनारी लावली या नाव...
घटनेच्या पहिल्या पानावरती
गाजतय माझ्या भिमाच नाव
आज तिरंगा झालं नामी साऱ्या देशाची त्याला सलामी
कार्य भिमाच आलंय कामी
सदा रूनी तयचे आम्ही
देशा संग आज नटविला
जिल्हा, तालुका, गाव
घटनेच्या पहिल्या पानावरती
गाजतय माझ्या भिमाच नाव
होत ओसाड पिकवल रान
विद्यापति असा विद्वान
असं देशाला दिलंय दान
ग्रंथ मौलिक संविधान...
लोकशाहीला मुजरा करती
रंक आणि ते राव..
घटनेच्या पहिल्या पानावरती
गाजतय माझ्या भिमाच नाव
काळी रात काळात धळी
नवा प्रभा अशी उजली
महती भीमाची जगाला कळली
भाग्य रेषा ही देशाची जुळली
देश क्रांतीच्यासाठी उत्तम
केला इथे उठाव...
घटनेच्या पहिल्या पाना वरती
गाजतय माझ्या भिमाच नाव
0 Comments