Subscribe Us

header ads

Bhartiya Ghatnecha song lyrics | भारतीय घटनेचा तू शिल्पकार आहे सुगंधा परी तवं कीर्ती दिगंतात वाहे lyrics

Song Details: Song: Bhartiya Ghatnecha Album: Bhima Tujhya Pathavar Singer: Music: Lyrics: Music Label: T-Series

भारतीय घटनेचा तू शिल्पकार आहे
सुगंधा परी तवं कीर्ती दिगंतात वाहे                ।। धृ ।।

भक्ती - भावं श्रद्धा सुमने तुला अर्पितांना 
कंठ दाटुनिये अमुचा, पूर लोचनांना... पूर लोचनांना
तुझी स्मृती अंतःकरणी, दुःख कोरत आहे
सुगंधा परी तवं कीर्ती दिगंतात वाहे                ।। १ ।।

क्षुद्र म्हणुनी जे जे मानव हीन लेखलेले
तमातुन काढून त्या तू प्रकाशित केले... प्रकाशित केले
कोटी कोटी जनतेचा तू , मार्ग दीप आहे
सुगंधा परी तवं कीर्ती दिगंतात वाहे               ।। २ ।।

चंदना परी तू झिजूनी कष्ट सोसलेस
ज्ञानसूर्य तूची अमुचा तूचं बोधी वृक्ष... तूचं बोधी वृक्ष
तुझी कथा इतिहासाला साक्षीभूत आहे
सुगंधा परी तवं कीर्ती दिगंतात वाहे              ।। ३ ।।


Post a Comment

0 Comments