Majha Bhimraya Lyrics- Mahamanvachi Gauravgatha | Star Pravah | माझा भीमराया song lyrics

Buddha Bhim Songs
0


क्रांतिसूर्य तू शिल्पकार तू भारताचा
बोधिसत्व मुकनायका
मोडल्या रूढी त्या परंपरा दिव्य तेजा
तूच सकल न्यायदायका
 
जीवन तुझे आम्हास प्रेरणा
दाही दिशा तुझीच गर्जना
भीमराया माझा भीमराया
भारताचा पाया माझा भीमराया
आला उद्धराया माझा भीमराया
 
स्पर्षिले तू ओंजळीने
खुले केले पाणी चवदार तळ्याचे
हक्क देऊन माणसाचे
केले सोने पीडितांच्या जीवनाचे
 
शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा
शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा
मार्ग प्रगतीचा दाविला दीना
भीमराया माझा भीमराया
भारताचा पाया माझा भीमराया
आला उद्धराया माझा भीमराया  
Tags

Post a Comment

0 Comments

Post a Comment (0)
3/related/default