Song Details: Song: Laal Divyachya Gaadila Album: Laal Divyachya Gaadila Singer: Anand Shinde Music: Harshad Shinde Lyrics: Ramchandra Janrao Music Label: T-Series
राजा राणी च्या जोडीला, पाच मजली माडीला .. २
आहे कुणाचं योगदान लाल दिव्याच्या गाडीला ॥ धृ ॥
तू कुळाचा भिकारी आता आलीया भालधारी
या माडीत, गाडीत आता शंकर मल्हारी ..२
जत्रा, उरूस करतोचं तुझ्या खेड्यातल्या वाडीला ..२
आहे कुणाचं योगदान लाल दिव्याच्या गाडीला ..२ ॥ १ ॥
पंच पकवान खाणाऱ्या कधी तोंडात जय भीम
शिळ तुकडं चारलं त्यांना करतोय सलाम ..२
तुला मुभाचं नव्हती रं कुठं मंदिर, चावडीला..२
आहे कुणाचं योगदान लाल दिव्याच्या गाडीला ..२ ॥ २ ॥
मोठा साहेब झालास, बापाला विसरलास
गेला असता स्मशानी भक्ष असता गीधाढाचं ..२
असता महाग तू वेड्या आता बिडी-न-काडीला ..२
आहे कुणाचं योगदान लाल दिव्याच्या गाडीला ..२ ॥ ३ ॥
तुला भीमानं माणूस केलं, तुझ्यासाठीच श्रम वेचीलं
नको विसरू भिमाचे मोल, बोल गर्वाने जय भीम बोल ..२
भिमकार्यात ज्यानं राव कधी वेळ न दवडीला ..२
आहे कुणाचं योगदान लाल दिव्याच्या गाडीला ..२ ॥ ४ ॥
राजा राणी च्या जोडीला, पाच मजली माडी ला ..२
आहे कुणाचं योगदान लाल दिव्याच्या गाडीला ..२
0 Comments