नीट बघून घे अक्षर तुला इंग्रजी शिकवतो बरं..2
असं बसून माझ्या मोर बोल A फॉर आंबेडकर
B म्हणताच भिमराव आठवला पाहिजे
C फॉर कास्ट बुदधीष्ट म्हटलच पाहिजे
D फॉर होऊन डॉक्टर
E म्हणजे इंग्लिश खरं
असं बसून माझ्या मोर बोल फॉर आंबेडकर
F फॅरिनचा फरिन ला भिम गेला
G फॉर ग्रेट पदव्या घेऊन आला
Hहायफाय झाल्यावर
I फॉर इंडिया सुंदर
असं बसून माझ्या मोर बोल फॉर आंबेडकर
Jजयभीम चा विसरू नको तू नारा
ok म्हणजे किंग बहुजनांचा प्यारा
Lम्हणजेच लीडर
M महाराच क्रांती घर
असं बसून माझ्या मोर बोल & फॉर आंबेडकर
N फॉर नागपूर ची बोले दीक्षाभूमी
O फॉर ओन्ली हा धम्म बुद्धाचा नामी
P फॉर पेन ती लेखणी आहे भिमाची
Q म्हणजे ती रांग पाहिजे ज्ञानाची
R फॉर भीमाचा RPI पक्ष
S फॉर समाज हा राहावा दक्ष
T' फॉर टीचर तुला वळण लावून
U फॉर युनायटी एक बोल होऊन
V फॉर व्हिक्टरी भिम विजयी पाहून,
करावा अभ्यास भिमासारखा राहून
W म्हणजे होल अँड सोल भीमराव
झाल्यावर..2
X Y Z ते सारे बघा झुकले चरणावर
सारं प्रथम ध्यानी धर
भिमासारख शिक्षण खरं
असं बसून माझ्या मोर बोल A फॉर आंबेडकर
0 Comments