सुखं मिळेल बुद्ध विहारत
SONG: Sukh Milel Buddha Viharaat
ALBUM: Kayada Bheemacha
SINGER: Anand Shinde
MUSIC: Harshad Shinde
LYRICS: Mukund Sonavne
MUSIC LABEL: T-SERIES
का गं देवाला पूजतेस घरात
सुखं मिळेल बुद्ध विहारात ॥धृ॥
चुकली कातू धम्माची वाट
अडवळनाचा चढते का घाट
यादेवांनी लावलिय वाट
कशाला त्यांचा करायचा थाट
नको धडपडू अशी अंधारात
सुखं मिळेल बुद्ध विहारात ॥१॥
देविदेवतांची नको ती भाषा
त्यांनीच केली आपली निराशा
अंधश्रद्धेची मनात आशा
घरदाराचा होईल तमाशा
नको आणून घेऊस उरात
सुखं मिळेल बुद्ध विहारात ॥२॥
त्रीसरणाचे कर पालन तू
पंचशीलेला रोज म्हण तू
तथागताचे कर स्मरण तू
भीमबाबाचे धर चरण तू
बुद्ध वंदना म्हणावी सूरात
सुखं मिळेल बुद्ध विहारात ॥३॥
शांति सुखाचे देवरदान
दाविला बुद्ध भीमरायान
त्या तत्वाच कर आचरण
जगात तुजला मिळेल मान
सांगे मुकुंद नको ही वरात
सुखं मिळेल बुद्ध विहारात ॥४॥
सुखं मिळेल बुद्ध विहारात ॥धृ॥
चुकली कातू धम्माची वाट
अडवळनाचा चढते का घाट
यादेवांनी लावलिय वाट
कशाला त्यांचा करायचा थाट
नको धडपडू अशी अंधारात
सुखं मिळेल बुद्ध विहारात ॥१॥
देविदेवतांची नको ती भाषा
त्यांनीच केली आपली निराशा
अंधश्रद्धेची मनात आशा
घरदाराचा होईल तमाशा
नको आणून घेऊस उरात
सुखं मिळेल बुद्ध विहारात ॥२॥
त्रीसरणाचे कर पालन तू
पंचशीलेला रोज म्हण तू
तथागताचे कर स्मरण तू
भीमबाबाचे धर चरण तू
बुद्ध वंदना म्हणावी सूरात
सुखं मिळेल बुद्ध विहारात ॥३॥
शांति सुखाचे देवरदान
दाविला बुद्ध भीमरायान
त्या तत्वाच कर आचरण
जगात तुजला मिळेल मान
सांगे मुकुंद नको ही वरात
सुखं मिळेल बुद्ध विहारात ॥४॥
का गं देवाला पूजतेस घरात
सुखं मिळेल बुद्ध विहारात
सुखं मिळेल बुद्ध विहारात
0 Comments