Subscribe Us

header ads

Udharli Koti Kule Bhima Tujhya Janmamule Song Lyrics In Marathi || उद्धरली कोटी कुळे भीमा तुझ्या जन्मामुळे




उद्धरली कोटी कुळे भीमा तुझ्या जन्मामुळे
उद्धरली कोटी कुळे । भीमा तुझ्या जन्मामुळे
एक ज्ञान ज्योतीने कोटी कोटी ज्योती
तळपतात तेजाने तुझ्या धरती वरती
अंधार दूर तो पळे -भीमा तुझ्या जन्मामुळे   ।।धृ।।


जखड बंद पायातील साखळदंड
तटा तटा तुटले तू ठोकताच दंड
झाले गुलाम मोकळे -भीमा तुझ्या जन्मामुळे  ।।१।।


कुजे वृक्ष तैसाच होता समाज
हिरवी हिरवी पाने अन तयालाच आज
अमृताची आली फळे -भीमा तुझ्या जन्मामुळे  ।।२।।


धम्मचक्र फिरले गेला गेला कलंक
ज्ञानदाता झाला आज रावास रंक
पंखी सुगंध दरवळे -भीमा तुझ्या जन्मामुळे!!!  ।।३।।


-वामनदादा कर्डक

Post a Comment

0 Comments