Subscribe Us

header ads

भीम रक्तात ली आग पाहिजे Song Lyrics |



ऐक नरा भीम वीरा 

तुला आली जाग पाहिजे 

भीम रक्तात ली आग पाहिजे    ||धृ||


पुत्र भीमाचा आहेस जर

जातीवाद्यांच्या चढ छातीवर 

डरकाळी दे आरोळी 

असा शिकारी वाघ पाहिजे 

भीम रक्तात ली आग पाहिजे    ||१||


चारित्र्य तुझे असावे बरे

वर्तन तुझे ठरावे खरे

तेज हवा निस्तेज नको

सुर्या सारखा बेदाग पाहिजे

भीम रक्तात ली आग पाहिजे    ||२||


बातमीपत्रात मी वाचलं 

भगिनीला आपल्या कोणी लुटलं

अधर्माचा कुकर्माचा 

तुला आला राग पाहिजे

भीम रक्तात ली आग पाहिजे     ||३||


लढवय्याचा वंशज असुन

राहु नको तु गप्प बसून 

पुर्वज तुझे होते जसे

नागवंशाचा नाग पाहिजे

भीम रक्तात ली आग पाहिजे    ||४||


पाहुण भीमाच्या पाऊलखुणा

चालताना ना व्हावा ऊणा

नागनाथा तुही आता

आला मागोमाग पाहिजे

भीम रक्तात ली आग पाहिजे    ||५||



Post a Comment

0 Comments