Kumbhara Pari Tu Bhima Full Song Lyrics | कुंभारा परी तू भिमा | भिम गीत | Dr. Babasaheb Ambedkar Song Lyrics
कुंभारापरी तू भीमा, समाजाला घडविले
धिक्कारुन गुलामीला ,बुद्धाकडे वळविले ||धुु||
बावीस प्रतिज्ञेची, भीमा तू दीक्षा दिली
बुद्धाच्या विचारांची, भीमा तू भिक्षा दिली
प्रगतीच्या शिखरावरी, आम्हाला चढविले
कुंभारापरी तू भीमा, समाजाला घडविले ||१||
जीवन उद्धरले, पाळताना पंचशीला
झोपडीच्या जागी आता, दिसू लागला बंगला
लाचारी-गरीबीला, तूच दूर पळविले
कुंभारापरी तू भीमा, समाजाला घडविले ||२||
दरवाजे केले खुले, शिक्षणाच्या भवनाचे
दूध आम्हा पाजियले, गुरगुरत्या वाघिणीचे.
तुझ्या कष्टापायी भीमा, खूप काही मिळविले
कुंभारापरी तू भीमा, समाजाला घडविले ||३||
बुद्धाच्या धम्माने, केली लई नवलाई
धम्माकडे वळले, भीमा तुझे अनुयायी
सर्व पोटजातीला, अमृताने जुळविले
कुंभारापरी तू भीमा, समाजाला घडविले ||४||
कुंभारापरी तू भीमा, समाजाला घडविले
धिक्कारुन गुलामीला ,बुद्धाकडे वळविले
