संघर्षाची आणि महासंग्रामाची
युगप्रवर्तक महामानवाची हि कहाणी आहे भीमरायाची
किती आले किती गेले किती झाले
ना झाला कुणी भीमावाणी
ना झाला दिन दुबळ्यांचा धनी
अन सांगा माझ्या भीमावाणी
किती आले किती गेले किती झाले
ना झाला कुणी भीमावाणी ||धृ||
कुणी नव्हतं आधार देणारा रे
कुणी झाला नाही आसु पुसणारा रे
आला धावत तो आला धावत तो
आला धावत तो धावत तो धावत तो
आला धावत तो असा देवावानी
ना झाला कुणी भीमावाणी ||१||
दलितांच्या जीवनाची होरपळ
त्यांच्या संसाराची परवळ
गेला लावुनिया गेला लावुनिया
गेला लावुनिया लावुनिया लावुनिया
गेला लावुनिया बोट मधावाणी
ना झाला कुणी भीमावाणी ||२||
त्याच्या संसाराचा भार उचलया
सार्या समाजाचा रथ हाकलाया
नाही झाली कुणी नाही झाली कुणी
नाही झाली कुणी झाली कुणी झाली कुणी
नाही झाली कुणी माझ्या रमावाणी
ना झाला कुणी भीमावाणी ||३||
हिंदू धर्माचे जीने नाकारीले
बुद्ध धम्मच त्याने स्विकारीले
अशी देऊनिया अशी देऊनिया
अशी देऊनिया देऊनिया देऊनिया
अशी देऊनिया गेला बुद्ध वाणी
ना झाला कुणी भीमावाणी ||४||
सार्या जगामध्ये भीम असा गाजला
त्याच्या किर्तीचा डंका असा वाजला
लोक गाती आज लोक गाती आज
लोक गाती आज गाती आज गाती आज
लोक गाती आज मिलिंदाची गाणी
ना झाला कुणी भीमावाणी ||५||
0 Comments