कोणी नाही भीमासारखा | Koni Nahi Bhima Sarakha
Song - Koni NAhi Bhima Sarakha
Lyrics - Vaman Kardak
Album- Kohinoor Bharatacha
Singer - Vitthal Hedukar
Music by -
Music Label -
ह्या संसारी दलितोद्धारी
महाउपकारी, झाला अमुचा सखा
कोणी नाही भीमासारखा ||धु||
पडीक भूमी जीवन अमुचे
कुणी कसेही तुडवित होते
मालक झाला त्याच भूमीचा
भूषविले ते मंगल नाते
तन मन कसूनी, बीज रुजवुनी
पिकवूनी गेला पिता...
कोणी नाही भीमासारखा ||१||
जातीयतेच्या अंधारातून
खंबीरतेने पुढे निघाला
करुनिया विद्येची साधना
विद्वत्तेचा पंडित झाला
थोर किती तो, घटनापती तो
तया तुम्ही ओळखा...
कोणी नाही भीमासारखा ||२||
बुद्धप्रणाली अंगीकारून
संघटली ती शक्ती मोठी
पंचशीलेने केले पावन
पिडलेले जन कोटी कोटी
हे विजयाचे, कार्य तयाचे
आता तरी पारखा...
कोणी नाही भीमासारखा ||३||
0 Comments