Subscribe Us

header ads

Mazi Ajii Mhanayachi Ovi Hi Jatyavar Marathi Lyrics | माझी आजी म्हणायची ओवी ही जात्यावर Marathi Lyrics





Song - Mazi Ajii Mhanayachi Ovi Hi Jatyavar 

Lyrics by - Kiran Sonavane 

Singer - Aniruddha Wankar 

Release Date - Year 2017


माझी आजी म्हणायची

ओवी ही जात्यावर

भीम बनला सावली

कोटी कोटीच्या माथ्यावर     ||धॄ||


राही लहान्या खोलीत

केला अभ्यास रस्त्यावर

नाही खुर्ची टेबल

कधी बसला पोत्यावर

माझी आजी म्हणायची...     ||१||


नाही भिमाने ठेवली

कधी सुपारी दातावर

पहा आजचे पुढारी

बसती दारू गुत्त्यावर

माझी आजी म्हणायची...     ||२||


नाही राहिला विश्वास

आता एकाही नेत्यावर

बेकी करू नका किरण

तुम्हच्या पडेल पथ्यावर

माझी आजी म्हणायची...     ||३||


माझी आजी म्हणायची

ओवी ही जात्यावर

भीम बनला सावली

कोटी कोटीच्या माथ्यावर



Post a Comment

0 Comments