Subscribe Us

header ads

लय बळ आलं माझ्या दुबळ्या पोरात Marathi Lyrics


SINGER - MANJUSHA SHINDE LYRICS - PRAKASH JADHAV VIDEO - SHAIKH NAEEM RECORDING - SUMIT DANDGE BORGAONKAR SWAR LAHAR STUDIO , AURANGABAD

लय बळ आलं माझ्या दुबळ्या पोरात

बाबासाहेबामुळ तुझ्या न माझ्या घरात     ।।धृ।।


गुर ओढणारा पोरगा माझा साहेब झाला

तहसीलीतला मोठा आता नायब झाला

त्याचा दरारा असे सरकारी नौकरात

बाबासाहेबामुळ तुझ्या न माझ्या घरात    ।।१।।


रान वनातला माणूस आता गावात आला 

सार्या गावचा कारभारी आमचा येडूबा झाला

झाला सरपंच बोलाया लागला जोरात

बाबासाहेबामुळ तुझ्या न माझ्या घरात    ।।२।।


एका विहिरीवर पाणी बाया लागल्या भराया

तिथं समतेच मंदिर आता‌ लागल्या बांधाया

नातं जुळू लागलं खालच्या वरच्या थरात

बाबासाहेबामुळ तुझ्या न माझ्या घरात    ।।३।।


गाव पंक्तीत आता बसू‌ लागला प्रकाश

परिवर्तनातला तो दिसु लागला विकास

भर चौकात आता निघाया लागली वरात

बाबासाहेबामुळ तुझ्या न माझ्या घरात    ।।४।।

Post a Comment

0 Comments