भीमा तुझ्या महुला जाऊन काल आलो lyrics - Bheema Tujhya Mahula song lyrics in marathi

Buddha Bhim Songs
0

Bheema Tujhya Mahula


Bheema Tujhya Mahula · Krishna Shinde

Producer: Tips Industries Ltd.
Music Publisher: Tips Industries Ltd.
Lyricist: Krishna Shinde
Composer: Krishna Shinde


भीमा तुझ्या महुला जाऊन काल आलो 
तू जन्मल्या ठिकाणी राहून काल आलो ।।धृ।।

तू रांगलास जेथे तेथेच मान झुकली 
ती धूळ मी कपाळी लावून काल आलो ।।१॥।

आई तुझी भिमाई सातारलाच गेली 
तेथेही दोन अश्रृ वाहून काल आलो ।।२।।

जाऊन दूर देशी तू आणली शिदोरी 
मी त्यातलीच थोडी खाऊन काल आलो ।।३।।

दिल्लीतला खजिना तू वाटणार होता 
तेथे तुझेच पाणी दावून काल आलो ।।४॥

दीक्षा भूमी सभोती हर्षाने दाटलेली 
नागांची नागनगरी पाहन काल आलो ।।५ ॥

देह जाळणार होते, मी टाळणार होतो 
वामनसवेच तेथे धावून काल आलो ।।६।।


Post a Comment

0 Comments

Post a Comment (0)
3/related/default