Subscribe Us

header ads

Mala Tujhya Rakta Madla Bhim Pahude song lyrics | मला तुझ्या रक्ता मदला भीम पाहूदे lyrics

Mala Tujhya Rakta Madla Bhim Pahude |
मला तुझ्या रक्ता मदला भीम पाहूदे



Mala Tujhya Rakta Madla Bhim Pahude |
मला तुझ्या रक्ता मदला भीम पाहूदे

निर्माते - धम्मा धन्वे (Dhamma Dhanve) गीतकार - कवी केवळ कावळे गायिका - भाग्यश्री इंगळे संगीत - हिरल कांबळे (DJ HK STYLE) वीडियो Edit - सनी साळवे Thambnail Art - केतन माळी Record Label - HK STYLE विशेष आभार कवी केवळ कावळे
अरे समाजाच्या साठी तुझ रक्त वाहु दे
अन मला तुझ्या रक्ता मधला भीम पाहू दे
अन पैदा हाऊ दे असा तू पैदा हाऊ दे
अन मला तुझ्या रक्ता मधला भीम पाहू दे        ॥धृ॥
 
रोज मरते इथे जनता भोळी
होते कोनाच्या जीवनाची होळी
राजकरत्याला लाज नाही थोडी
त्याच निखार्यावर शेकतात पोळी 
कुणी नावासाठी झुरताना पाहिले
अहो घर आपलेच भरताना पाहिले
ज्याने धोका दिला बा भीमाला
पाय त्याचेच धरताना पाहिले
 अरे जाग येऊ दे तुला रे जाग येऊ दे
अन मला तुझ्या रक्ता मधला भीम पाहू दे         ॥१॥
 
कार्य भीमाचे तव हातून घडतील
तुला पाहून वैरी ही जळतिल
साम दाम दंड भेदाने छळतिल
तुझ्या छातिवरी गोळी कोणी झाडतील
तुझ्या धैर्याने लोक जेव्हा जुळतील
समता न्याय हक्का साठी झगड़तील
क्रांति कराया तुटुन पड़तील
तवा वैर्याचे अवसान गळतील
अन होउन जाऊ दे असा तू होउन जाऊ दे
अन मला तुझ्या रक्ता मधला भीम पाहू दे         ॥२॥
 
भीमराया चा तू शूर शिपाई
वैर्या तपती लढ़ाया लढाई
तुझा निर्धार खंबीर असावा
त्यात स्वार्थीपना ना दिसावा
अरे तुझ्या विचाराचा क्रांतिकारी रान पेटु दे
अन मला तुझ्या रक्ता मधला भीम पाहू दे         ॥३॥
 
कुणी कुनाचा उरलाच न्हाय
कवि केवळ आहे का उपाय
एक दुसर्याचे ओढ़नारे पाय
रथ भीमाचा हाकतील काय
मर्द तोच खरा भीमाच्या पोटी
भीम रथाची वाढवितो गती
त्याची वाघाच्या बछड्याची छाती
त्याला मरनाची वाटे ना भीती
अन पैदा हाऊ दे असा तू पैदा हाऊ दे
अन मला तुझ्या रक्ता मधला भीम पाहू दे        ॥४॥

Post a Comment

0 Comments