उसळत्या रक्ताचा पाडीला प्रभाव
गाडली ती पेशवाई केला वर्मी घाव
इतिहासात अजरामर शुर महाराचे नावं
भिमा कोरेगावं केले भिमा कोरेगावं ! ।।धृ।।
गाडली ती पेशवाई केला वर्मी घाव
इतिहासात अजरामर शुर महाराचे नावं
भिमा कोरेगावं केले भिमा कोरेगावं ! ।।धृ।।
तुमचे राजे आम्ही ठेवा तुम्ही हि जाण
म्हंटले महार काय देता आम्हा सन्मान
तुमच्या साठी लावू आमचा बळाचा प्राण
अहंकाराने चिडला तो पेशव्यांचा बाजीराव
भिमा कोरेगावं केले भिमा कोरेगावं !! ।।1।।
आस का धरता तुम्ही आमच्या कडे मानाची
असला शुर तुम्ही उज्ज जात ही आमची
श्वाना परी होत नाही बरोबर तुमची
अशी करमट त्या कावळ्यांनी
बघा केली काव काव
भिमा कोरेगावं केले भिमा कोरेगावं !!! ।।2।।
स्पुर्ती देई आम्हा आमच्या रक्ताचं नात
धडकले संघनात लडण्यात शिधनात
१८१८ साली दिला पेशव्या धाक
मान वंदनेला योद्याच्या येता माझे भिमराव
भिमा कोरेगावं केले भिमा कोरेगावं !!!! ।।3।।
0 Comments