Subscribe Us

header ads

दोनच राजे इथे गाजले

दोनच राजे इथे गाजले



दोनच राजे इथे गाजले,त्या कोकण पुण्य भूमी वर,
एक त्या रायगडा वर,एक चवदार ताळ्यावर               ।।१।।

रायगडा वर शिवरायांचा राज्याभिषेक झाला,
दलितांनी दलितांचा राजा महाडी घोषित केला,
दोन नार्मनी असे  शोभले दोन्ही वीर बहाद्दर,
एक त्या रायगडा वर,एक चवदार ताळ्यावर               ।।२।।

राजाचा एक पुत्र दुजा एक पुत्र सुभेदाराचा,
दोघांचा तर एकच बाणा होता उद्धाराचा,
निनादले दोघांच्या नावे कोकणातले डोंगर,
एक त्या रायगडा वर,एक चवदार ताळ्यावर               ।।३।।

एक जिजामातेने आणि एक मीरा आत्याने,
क्रांती निखारे दोन फुकले हृदयाच्या भात्याने,
दीपस्तंभ हे दोन लाभले वादळ अरबी सागर,
एक त्या रायगडा वर,एक चवदार ताळ्यावर               ।।४।।

शिवरायाने रयतेचा तो न्यायनिवाडा केला
तोच निवाडा भीमरायाच्या घटने मदी आला ,
परंपरेला प्रतापसिंगा दोघे मारती ठोकर,
एक त्या रायगडा वर,एक चवदार ताळ्यावर               ।।५।।

दोनच राजे इथे गाजले,त्या कोकण पुण्य भूमी वर
,एक त्या रायगडा वर,एक चवदार ताळ्यावर...... 

Post a Comment

0 Comments