Subscribe Us

header ads

तुझ्या हाती तूप आलं, तुझ्या हाती साय, समाजचं काय रं गड्या समाजचं काय

तुझ्या हाती तूप आलं, तुझ्या हाती साय,
समाजचं काय रं गड्या समाजचं काय



समाजचं काय गड्या समाजचं काय.
तुझ्या हाती  तूप आलं, तुझ्या हाती  साय,
तुझ्या हाती  तूप आलं, तुझ्या हाती  साय,
समाजचं काय  रं  गड्या समाजचं काय              ॥धृ॥

तुझ्या हाती  आहे गड्या  समाजाची नाडी ,
तुझ्या हाती  आहे गड्या  समाजाची नाडी ,
राहायला  माड़ी तुला, बसायला  गाड़ी,
राहायला  माड़ी तुला, बसायला  गाड़ी,
सांग  तुझा  धंदा असा आहे तरी  काय,
सांग  तुझा  धंदा असा आहे तरी  काय,
समाजचं काय रं  गड्या समाजचं काय              ॥१॥

काम नाही धाम नाही सकाळी उठुनी,
काम नाही धाम नाही सकाळी उठुनी,
सुख तुला सार  गड्या  येतय रं  कुठुनी,
सांग  तुझा  छंद  असा आहे तरी  काय,
सांग  तुझा  छंद  असा आहे तरी  काय,
समाजचं काय रं  गड्या समाजचं काय             ॥२॥

हॉटेलात रोज रोज जेवता कसे रे,
हॉटेलात रोज रोज जेवता कसे रे,
गल्ल्यावरी काहीतरी ठेवता कसे रे,
गल्ल्यावरी काहीतरी ठेवता कसे रे,
रोज रोज खाता  तुम्ही कोम्बडीचे पाय,
रोज रोज खाता  तुम्ही कोम्बडीचे पाय,
समाजचं काय रं  गड्या समाजचं काय            ॥३॥

तुझ्यासाठी तुझ्याकडं सार काही हाय रं,
तुझ्यासाठी तुझ्याकडं सार काही हाय रं,
माझ्यासाठी तुझ्याकडं आहे तरी काय रं,
माझ्यासाठी तुझ्याकडं आहे तरी काय रं,
वामनला पुसते रोज वामनची माय,
वामनला पुसते रोज वामनची माय,
समाजचं काय  रं  गड्या समाजचं काय         ॥४॥

तुझ्या हाती  तूप आलं, तुझ्या हाती  साय,
तुझ्या हाती  तूप आलं, तुझ्या हाती  साय,
समाजचं काय  रं  गड्या समाजचं काय

Post a Comment

0 Comments