Subscribe Us

header ads

Kunku Lavila Raman Bhimgeet Lyrics

कुंकू लाविलं रमानं



माझ्या भीमाच्या नावाचं
कुंकू लाविलं रमानं
कुंकू लाविलं रमानंकुंकू लाविलं रमानं

असे मधुर मंजुळ वाणी
ऐका रमाईची कहानी
वागे घरात नेमानं
कुंकू लाविलं रमानं

नाही गेली आज्ञाबाहेर
कधी आठवलं ना माहेर
केला संसार दमानं
कुंकू लाविलं रमानं

नाही केली आशा सोन्याची
करी चिंता सदा धन्याची
ठेवी पतीचा सन्मान
कुंकू लाविलं रमानं

रमा उपवाशी राहिली
दीन दलितांची माऊली
नाव कमविलं श्रमानं
कुंकू लाविलं रमानं

https://amzn.to/3Ak8oju

Post a Comment

0 Comments