Subscribe Us

header ads

Kayada Bhimacha Bhimgeet Lyrics -- कायदा भीमाचा पन फोटो गांधीचा शोभून दिसतो का नोटावर किती शोभाला असता भीम नोटावर टाय आणि कोटावर

कायदा भीमाचा 


Song Details:
Song: Kayda Bhimacha - Ambedkar song
Singer: MILIND SHINDE
Music: HARSHAD SHINDE
Lyrics: Dutta Paikrao
Music Label: T-Series

कायदा भीमाचा पन फोटो गांधीचा

शोभून दिसतो का नोटावर

किती शोभाला असता भीम नोटावर

टाय आणि कोटावर

 

खरा देशप्रेमी ठरला भीम घटनाकार

विद्देलाही पुरून उरला असा विद्द्यादार

देशा सावरल त्या गांधीला तारल

पेणाच्या त्या टोकावर

किती शोभाला असता भीम नोटावर

टाय आणि कोटावर

 

राष्ट्रपिता गांधी आणि जवाहर होते

त्यात एक महान माझे भीमराव नेते

ना कधीच हरले मागे ना सरले

केला इशारा त्या बोटावर

किती शोभाला असता भीम नोटावर

टाय आणि कोटावर

 

सत्यहित सर्वांचे भीमानेच पाहिले

म्हणून आज स्वातंत्र्य टिकून राहिले

मित्तल अंबानी ऋणी भीमाचे

थोर उपकार टाटा वर

 किती शोभाला असता भीम नोटावर

टाय आणि कोटावर

 

कोटी कोटी ह्या दिंनांचा भीम वाली ठरला

बहुजनांच्या हितासाठी देशो देशी फिरला

अमोल किर्ति गाजे भुवरती

सर्वांच्या या ओठावर 

किती शोभाला असता भीम नोटावर

टाय आणि कोटावर

 

कायदा भीमाचा पन फोटो गांधीचा

शोभून दिसतो का नोटावर

किती शोभाला असता भीम नोटावर

टाय आणि कोटावर

Post a Comment

0 Comments