बहुजनांवर अन्याय होई
मी जगू का मरु बाई
आम्हा कोणीच वाली नाही
अशा काळात भीम माझा
कसा धावून आला गं बाई
झालं सोन या जीवनाचं
केली भिमानं एकच सही
चांदीचे ताट आणि सोन्याचा घास
भीमा मुळ आम्ही घेतोय श्वास
माझ्या भीमाची सर बघा
कधी कुणाला येणार नाही
माझ्या बापाची सर बघा
कधी कुणाला येणार नाही
झालं सोन या जीवनाचं
केली भिमानं एकच सही ||1||
भीमा मुळे मोठा साहेब झाला
झाल्यावर बाप विसरून गेलो
मनुवाद्यांच्या काळात
शेण काढाया ठेवलं नाही
झालं सोन या जीवनाचं
केली भिमानं एकच सही ||2||
बुद्ध धम्माचा घेऊनी ज्ञान
लिहून दावलंय धम्मान गाणं
माईन केले जीवाचं रान
गाऊन दावल भीमाचं गाणं
गाणं भिमाचं गाऊन
ती देश विदेशात जाई
झालं सोन या जीवनाचं
केली भिमानं एकच सही ||3||
0 Comments