Lyrics by - Kiran Sonavane
Singer - Aniruddha Wankar
Release Date - Year 2017
माझी आजी म्हणायची
ओवी ही जात्यावर
भीम बनला सावली
कोटी कोटीच्या माथ्यावर ||धॄ||
राही लहान्या खोलीत
केला अभ्यास रस्त्यावर
नाही खुर्ची टेबल
कधी बसला पोत्यावर
माझी आजी म्हणायची... ||१||
नाही भिमाने ठेवली
कधी सुपारी दातावर
पहा आजचे पुढारी
बसती दारू गुत्त्यावर
माझी आजी म्हणायची... ||२||
नाही राहिला विश्वास
आता एकाही नेत्यावर
बेकी करू नका किरण
तुम्हच्या पडेल पथ्यावर
माझी आजी म्हणायची... ||३||
माझी आजी म्हणायची
ओवी ही जात्यावर
भीम बनला सावली
कोटी कोटीच्या माथ्यावर
0 Comments