Subscribe Us

header ads

साऱ्या देशाचा बाप माझा भीमराव पावरफुल || भीमराव Powerful || Sarya Deshacha Baap Maza Bhimrao Powerful song lyrics

भीमराव Powerful



Bhim Song Details

Song : Sarya Deshacha Baap Maza Bhimrao Powerful
Singer : Kadubai Kharat
Lyrics : Dhamma Dhanve
Music : DJ HK STYLE | Hiral Kamble
VfX Video Visual Artist : Sunny Salve
Thambnail : Ketan Mali
Producer : Rahul Bhambre
Record Label : HK STYLE


घडणार नाही असं घडवून आणलं
महिलांच दुःख माझ्या भीमानं जाणल
गेलं तुमच्या वाट्याचं चूल आणि मूल
साऱ्या देशाचा बाप माझा भीमराव पावरफुल   ॥धृ॥

नव्हती शिकायला संधी होती बोलायला बंदी
भीमराव जन्मा आले आम्हा मिळाली ती संधी ‍
वाळवंटामध्ये खुले जसं गुलाबाच फुल 
साऱ्या देशाचा बाप माझा भीमराव पावरफुल   ॥१॥

बाबासाहेबांचे पोर आम्ही राहतोया थाटात
आम्ही सुट बुट कोटात यांच्या दुखतया पोटात
आमची एकी बघून सारे झालेत गुल
साऱ्या देशाचा बाप माझा भीमराव पावरफुल   ॥२॥

बाबासाहेबांची लेक वार करती आरपार
धन्वे ची लेखणी जणू तलवारीची धार
कडूमाईच्या गाण्याचा आवाज वाढवा फुल
साऱ्या देशाचा बाप माझा भीमराव पावरफुल   ॥३॥

Post a Comment

0 Comments