Kohinoor Bharatacha · Shahir Vithal Umap
होता तो भीम माझा कोहिनूर भारताचा
बुद्धाचा मार्ग त्यांनी दाविला तारणाचा ॥धृ॥
जीवनपथास उजळे होऊनि दीपस्तंभ
प्रबुद्ध बौद्ध करण्या केला इथे आरंभ
उज्ज्वल भविष्यासाठी झिजला तो देह त्यांचा
बुद्धाचा मार्ग त्यांनी दाविला तारणाचा ॥१॥
पांडित्यपूर्ण शैली होती ती भाषणाची
सदैव दूरदृष्टी दृढनिश्चयी भीमाची
बाबांचा मानी पिंड बुद्धीच्या सागराचा
बुद्धाचा मार्ग त्यांनी दाविला तारणाचा ॥२॥
ग्रंथात ग्रंथरूपी राही अमर तो आज
विष्णू कधी ना लोपे प्रगल्भ भीमराज
गुणवान पूज्य ठरला आदर्श गौतमाचा
बुद्धाचा मार्ग त्यांनी दाविला तारणाचा ॥३॥
होता तो भीम माझा कोहिनूर भारताचा
बुद्धाचा मार्ग त्यांनी दाविला तारणाचा
0 Comments