दिला कायद्याचा दणका
Song: Dila Kayadyacha Danaka
Album: Yogdaan Bheemach
Singer: Milind Shinde
Music: Harshad Shinde
Lyrics: Damodar Shirwale
Music Label: T-Series
दिला कायद्याचा दणका हात जोडाया लावल
भीमरायान रूढीला जग सोडाया लावल ॥धृ॥
थान मांडून बसलेली गरिबांच्या माळ्यावर
एकट्या भीमाने आणलीती रूढी तळ्यावर
सनातंनांच्या मर्जीच मत मोडाया लावल
भीमरायान रूढीला जग सोडाया लावल ॥१॥
आम्ही निराधार सारे नव्हतं आम्हाला रक्षण
बामनाची कटुनीती नव्हतं आम्हाला शिक्षण
संविधानाच्या रेट्यान नात तोडाया लावल
भीमरायान रूढीला जग सोडाया लावल ॥२॥
ऊच्च निच्च शिळ्यापाई आम्ही अज्ञानात
भीमरायाच्या कष्टाने भर पडली ज्ञानात
ते लिखाण मनुच सार खोडाया लावल
भीमरायान रूढीला जग सोडाया लावल ॥३॥
सारी भीमाची करणी नेवारीला दुख
दामोदराच्या वाटेला आज भरपूर सुख
समतेच्या वाटाण पाय ओढाया लावल
भीमरायान रूढीला जग सोडाया लावल ॥४॥
दिला कायद्याचा दणका हात जोडाया लावल
भीमरायान रूढीला जग सोडाया लावल
0 Comments