उद्धरली कोटी कुळे भीमा तुझ्या जन्मामुळे
उद्धरली कोटी कुळे । भीमा तुझ्या जन्मामुळे
एक ज्ञान ज्योतीने कोटी कोटी ज्योती
तळपतात तेजाने तुझ्या धरती वरती
अंधार दूर तो पळे -भीमा तुझ्या जन्मामुळे ।।धृ।।
जखड बंद पायातील साखळदंड
तटा तटा तुटले तू ठोकताच दंड
झाले गुलाम मोकळे -भीमा तुझ्या जन्मामुळे ।।१।।
कुजे वृक्ष तैसाच होता समाज
हिरवी हिरवी पाने अन तयालाच आज
अमृताची आली फळे -भीमा तुझ्या जन्मामुळे ।।२।।
धम्मचक्र फिरले गेला गेला कलंक
ज्ञानदाता झाला आज रावास रंक
पंखी सुगंध दरवळे -भीमा तुझ्या जन्मामुळे!!! ।।३।।
-वामनदादा कर्डक
0 Comments