Subscribe Us

header ads

Bhimrayavani Pudhari Hoil Ka Song Lyrics || माझ्या भीमराया वाणी सांगा पुढारी होईल का

माझ्या भीमराया वाणी सांगा पुढारी होईल का

Song : Bhimrayavani Pudhari Hoil Ka
Singer : Milind Shinde
Lyrics : Godhan Sawant
Music : Pralhad Shinde
Title : Soniyachi Ugavali Sakaal

सुज्ञानाचा निर्मल झरा 
भीमासारखा माणूस खरा 
जन्मा येईल का 
माझ्या भीमराया वाणी सांगा पुढारी होईल का 
असा पुढारी होईल का सांगा पुढारी होईल का   ॥धृ॥

मानापाणाला कधीच नाही चुकून हा पापणारा 
धंनराशीला पाहून कधी कर्तव्य ना चुकणारा 
वादळातली समजनौका किनारी लविल का 
माझ्या भीमराया वाणी सांगा पुढारी होईल का 
असा पुढारी होईल का सांगा पुढारी होईल का    ॥१॥

करुणेचा सागर होऊन करुणेने कळवळणारा 
दिनदलितासाठी दिन रात्री तळमळणारा 
भीमासारखा कर्तुत्वाचा पहाड होईल का 
माझ्या भीमराया वाणी सांगा पुढारी होईल का 
असा पुढारी होईल का सांगा पुढारी होईल का    ॥२॥

देश विदेशी जनता ज्ञान बघून चकित होई 
अशी भीमाची करणी तिला जगात मोलचं नाही 
अशीच गोधन दिनदलितांची ओझी वाहिल का 
माझ्या भीमराया वाणी सांगा पुढारी होईल का 
असा पुढारी होईल का सांगा पुढारी होईल का    ॥३॥

सुज्ञानाचा निर्मल झरा 
भीमासारखा माणूस खरा 
जन्मा येईल का 
माझ्या भीमराया वाणी सांगा पुढारी होईल का 
असा पुढारी होईल का सांगा पुढारी होईल का 

Post a Comment

0 Comments